हे संकेत मिळाले की समजा तुमचा वाईट काळ संपला होणार आता भरपूर प्रगती

बिजनेस

नमस्कार मंडळी

आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना असतात, ज्या आपल्याला चांगल्या-वाईट दिवसांचे संकेत देत असतात. पण, असे संकेत आपल्याल कळत नाहीत किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे देव आपल्याला भविष्यात येणारे संकेत आधीच देत असतो.
हे संकेत मिळाले तर समजून घ्या की आता इथून पुढे तुमचे वाईट दिवस संपले, आता तुमच्या आयुष्यात तुमची भरपूर प्रगती होणार आहे. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली घटना घडणार असते किंवा येणाऱ्या काळामध्ये प्रगतीची मोठी संधी मिळणार असते. अशावेळी आपला देव, आपले स्वामी आपणाला काहीतरी संकेत देत असतात.

हे संकेत आपण समजून घेतले पाहिजेत. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे , म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे. ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्याचसोबत आपल्याला काही संकेत ही देतात. हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात.

घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा. चला तर मग जाणून घेऊया हे संकेत. काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते, आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्‍तीचा वास आहे. किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा ही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे

म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका.आपल्या खिशातून अचानक पैसे पडतात. खिशातील नाणी खाली पडतात. यावेळी असे समजून जावे की आपणावर आपल्या देवी-देवतांची कृपा झाली आहे.आणि आपण पहाल की या घटनेनंतर फक्त बारा तासाच्या आत आपणाला आपल्या प्रगतीची काहीना काही बातमी ऐकायला किंवा पाहायला मिळेल. बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गूळ अर्पण करा. असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते, यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.आपण आपल्या घरामध्ये एखादा नारळ आपल्या घरामध्ये आहे आणि अचानक तो तडा गेला तर आपण असे समजा की घरातील सर्व वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा ही त्या नारळाने शोषली आहे.

आणि त्यानंतर लगेचच आपण पहाल की कुठली ना कुठली फायद्याची गोष्ट किंवा पैसा-अडका ची गोष्ट आपल्या कानावर पोहोचेल. समजा आपल्या घरांमध्ये मध ठेवला आहे. आणि घरातील हा मग काही कारणाने बाटलीतील बाहेर येऊन सांडला किंवा अचानक बाटली फुटली.तर हाही एक चांगला संकेत समजावा. या घटनेनंतर आपणही समजावे की आपणाला लवकरच मोठा चांगला धनलाभ होणार आहे. आणि अनेक ठिकाणी या संकेतानुसार असा धनलाभ झाल्याचेही ऐकिवात आहे. आपल्या घराशेजारी अचानक तुळशीची रोपे उगवली तर समजा की हा स्वतः ब्रह्म विष्णू यांनी आपणाला संकेत दिला आहे.

या संकेतानुसार माता लक्ष्मी ही आपणाकडे वास्तव्यास येत असल्याचे समजते. यामुळे आपल्या घराशेजारी किंवा अंगणात कुठेही तुळशीची रोपे अचानक आल्यास हा शुभ संकेत मानावा.तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खुप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल संकेत देतात. आपण अस ही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्‍ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे.

कोणत्या तरी व्यक्‍तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आपणालाही याच्यातील काही संकेत दिसून आल्यास समजून घ्यायची आपले वाईट दिवस संपले आहेत. आणि इथून पुढच्या काळात आपली नक्कीच प्रगतीच प्रगती होणार आहे. आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडणार आहे.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.