घरात खुप कटकटी आहे भांडणे होतात धनाची कमतरता भासते घरात हे छोटे बदल करा चांगले सुख आणि दुप्पट पैसा मिळेल

वास्तु

नमस्कार मंडळी,

वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळतात . यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-समृद्धी कायम रहाते . अशाच काही सोप्या नियमांबद्दल आज आपण जाणून घेऊ या.

पूजा घर मानसिक शांती, सकारात्मकता आणि घरातील लोकांच्या प्रगतीसाठी पूजा घर नेहमी घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला असायला हवे . कारण ते देवांचे स्थान असते . तसेच, पूजा घराच्या वर आणि खाली शिडी, शौचालय किंवा स्वयंपाकघर असू नये हे लक्षात ठेवा. घरत नेहमी स्वछता असावी.

घरची स्वछता घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवायला हवी . कारण घरातील कोळ्याचे जाळे, धूळ आणि घाण यामुळे अनेक वास्तुदोष निर्माण होत असतात . घरातील बाथरुम नेहमी स्वच्छ ठेवायला हवे . घराचा मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असायला हवा, तसेच दरवाजे चांगल्या स्थितीत असले हवे . ते उघडताना किंवा बंद करताना आवाज येता काम नये . तसेच त्यांचा रंग उडाला नाही ना, याची काळजी घ्या.

सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळणे – घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळल्याने अनेक वास्तु दोष नष्ट होतात. त्यामुळे हा उपाय रोज करायला हवा . यामुळे घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येत रहाते. झोपण्याची दिशा कधीही दक्षिण दिशाकडे पाय करुन झोपू नये . असे केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होत असतात . दक्षिण दिशेला डोके ठेवणे अत्यंत चांगले रहाते

घराचे मुख्य दार दक्षिण मुखी नसावे. यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा आरसा लावा ज्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही.घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक किंवा ऊँ आकृती लावावी.घराच्या पूर्वोत्तर दिशेत पाण्याचे कळश ठेवावे. घराच्या खि‍डक्या आणि दारं अश्या ठिकाणी असावे की सूर्य प्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत राहावा ज्याने घरातील लोकं आजारी पडत नाही .भांडण आणि वाद विवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवावा. स्वयंपाकघरात देव घर नसावं.

टोकदार वस्तू जसे कात्री, चाकू इत्यादींची टोकदार बाजू बाहेर असेल असे ठेवणे उत्तम नाही आहे. शयन कक्षात झाड नाही ठेवायला पाहिजे, पण आजारी माणसाच्या खोलीत ताजे फूल ठेवण्यास हरकत नसते. या फुलांना रात्री तेथून दूर करून द्यायला पाहिजे.मानसिक ताणापासून बचाव करण्यासाठी चंदनाची उदबत्ती लावायला पाहिजे. याने ताण कमी होण्यास मदत मिळेल.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.