तुमच्या देव घरात श्री यंत्र आहे का मग नक्की जाणून घ्या

भक्ति

नमस्कार मंडळी

मंडळी श्री विद्या ही आपल्याला मिळालेली एक महान देणगी आहे त्यामध्ये श्रीयंत्र वापरले जाणारे एक साधन आहे त्याचे महत्त्व खूप आहे सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे शिरोमणी आहे ज्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापन केले जाते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते लक्ष्मीची कृपादृष्टी सतत त्या परिवारावर असते असेही म्हटले जाते परंतु हे तयार करण्यासाठी एक योग्य असे मोजमाप आहे त्याच मापाप्रमाणे हे तयार केले पाहिजे श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात याची माहिती आज आपण करून घेणार आहोत

श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे पहिला फायदा होतो तो म्हणजे शुभलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो त्यासाठीच या श्रीयंत्राची रोज नित्यनियमाने पूजा सुद्धा केली पाहिजे दुसरा फायदा म्हणजे ताणतणावापासून मुक्ती मिळते अनेक घरात एकमेकांचे विचार जुळत नसतात त्यामुळे त्यांच्या घरात सतत भांडण होत असतात आणि म्हणून तणावाचे वातावरण निर्माण होते श्री यंत्राची स्थापना केली तर ताण-तणावापासून देखील मुक्ती मिळते.

घरात नेहमी शांतता नांदते आपल्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष नाहीसा होतो वास्तूंमध्ये दोष असतात त्यामुळे त्या घरातील कुटुंबावर अनेक प्रकारची संकट येत राहतात त्यावर उपाय म्हणून श्रीयंत्राची स्थापना केली जाते श्री यंत्राची स्थापना केल्यामुळे घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या मनाला मनशांती लागते त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील याचा चांगला परिणाम होतो त्यांचे आरोग्य चांगले राहते

आपल्या जीवनावर कळत नकळत ग्रहांचा प्रभाव पडत असतो आणि त्यामुळेच काही ग्रहांचे ग्रहदोष सुद्धा लागतात ते सुद्धा निघून जाण्यासाठी श्री यंत्रामुळे मदत होते यासाठी श्रीयंत्र घरामध्ये स्थापन केले जाते काही व्यक्तींच्या बाबतीत असे घडते की कितीही कष्ट केले तरी त्यांना म्हणावं तसा पैसा मिळत नाही त्यांच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळत नाही जर आपण घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर आपल्याला पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग सापडतात आणि धनसंपत्ती आपल्या घरात सहजरीत्या येते

त्याचबरोबर या श्रीयंत्राच्या प्रभावामुळे व्यवसायात सुद्धा भरभराट होते अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे होत असतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव निवास करते घरात सुख-समृद्धी शांतता राहते घरात आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत आणि धनधान्याची बरकत होते अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं. कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये