नमस्कार मंडळी
श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे श्रावणाच्या सोमवारी भगवान शंकरांची आराधना केल्याने मनातील सर्व इच्छा तर पूर्ण होतातच याशिवाय श्रावण महिन्यात भोलेनाथांची विधिवत पूजा करून श्रावणी सोमवारी उपवास करून बोलेनाथांना प्रसन्न केलं जात याव्यतिरिक्त ज्योतिष शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी त्या त्या राशीनुसार भगवान महादेवांची विशेष पूजा करावी त्याचं सुद्धा योग्य फळ प्राप्त होतं असं म्हणतात
तुम्हालाही लवकरात लवकर शिव पूजनाचे फळ हवे असेल भगवान महादेव लवकर प्रसन्न व्हावे आणि आशीर्वाद देऊन प्रत्येक इच्छा पूर्ण करावी असं तुम्हालाही वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे तर प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी आपापल्या राशीनुसार भगवान महादेवांची उपासना करायची आहे मग कोणत्या राशीच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यात महादेवांचे पूजन किंवा उपासना कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया
मेष राशी – मेष राशीच्या भाविकांनी भगवान महादेवांना लाल फुले अर्पण करावे आणि पाण्यात गुळ टाकून भोलेनाथांचा अभिषेक करावा यासोबतच नागेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींनी दही चंदन आणि पांढऱ्या फुलासह भगवान महादेवांना जलमिश्रित दूध अर्पण करावा याचबरोबर वृषभ राशीचे व्यक्तींनी शिवपूजन करताना रुद्राष्टकाचा पठण करावं
मिथुन राशि – मिथुन राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेवांचा अभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावं यासोबतच ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा
कर्क राशी – कर्क राशीच्या व्यक्तींनी भोलेनाथांना शुद्ध तुपाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत राहावा
सिंह राशी – सिंह राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर गूळ मिश्रित जल अर्पण करून गहू अर्पण करावे याबरोबरच महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांच्या पिंडी सोबत तुपाचा दिवा लावावा असं करणं सिंह राशीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं असं सांगितलं जातं
कन्या राशि – कन्या राशीच्या व्यक्तींनी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भगवान महादेवाला उसाच्या रसाचा अभिषेक करावा आणि पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय यमंत्राचा जप करावा
तुला राशि – तुला राशि च्या व्यक्तींनी महादेवांना सुगंधी अत्तर किंवा सुगंधी पाण्याने अभिषेक करावा आणि दररोज भगवान महादेवांच्या सहस्त्रनामांचा जप करावा
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेवांना पंचम्रतांना अभिषेक करावा याबरोबरच सुरक्षित राशीच्या व्यक्तींनी रुद्राष्टकाचा पठण किंवा श्रवण करावं
धनु राशि – धनु राशीच्या लोकांनी भगवान महादेवाला केशरीयुक्त दुधाचा अभिषेक करावा आणि बेलाची पानं आणि पिवळी फुलं अर्पण करावी त्यानंतर पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
मकर राशि – मकर राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पाण्यात गहू मिसळून भगवान महादेवाची पूजा करावी त्यांचा अभिषेक करावा आणि त्यानंतर पंचाक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा
कुंभ राशी – कुंभ राशीच्या व्यक्तींनी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि पूजा करावी शिवाय कुंभ राशीचे व्यक्तींनी शिवचालीसा पठण केल्याने सुद्धा लवकरात लवकर इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते असे म्हणतात
मीन राशि – मीन राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर जल मिश्रित दूध आणि साखरेची मिठाई अर्पण करावी आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपापल्या राशीनुसार महादेवांची पूजा उपासना करू शकता त्यामुळे तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळू शकते