नमस्कार मंडळी
भाद्रपद मध्ये येणाऱ्या अमावस्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा करण्याची आणि दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या खुश जमिनीतून उपटून टाकण्याची सुद्धा परंपरा आहे मात्र या अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात किंवा या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आईने मुलासाठी कोणता उपाय करावा चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात
पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील अमावस्या गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी आहे ही अमावस्या पहाटे ४ वाजून ४८ मिनिटांपासून सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी सकाळी ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत असेल मात्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात तर भाद्रपद महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पिठाच्या आकृती बनवून दुर्गा देवी सह ६४ देवींची म्हणजेच ६४ योगींची पूजा करण्याची परंपरा आहे
पिठोरी मध्ये पीठ या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असं संबोधले जातात या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्य या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचं म्हणलं जातं शिवाय महिला या दिवशी व्रत करतात आणि पिठाची नैवेद्य पिढोरी अमावस्येला देवीला अर्पण करतात म्हणूनच पिठोरी अमावस्या म्हणून या अमावस्येला संबोधल्या जातात पिठोरी अमावस्येच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करतात सायंकाळी ६४ योगिनींची चित्राच्या कागदाची पूजा करतात
स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभाव याबरोबरच मुलाबाळांची रक्षा व्हावी यासाठी पिठोरी अमावस्येला स्त्रिया हे व्रत मनोभावे करत असतात आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्र या पिठोरी अमावस्येच्या दिवशी महिलांनी आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी एक उपाय सुचवतात तो उपाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी नक्की करून पहावा ज्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल त्यांची निकाल चांगले येते शिव्या मुलांचा स्वभाव चिडचिडा असेल तर तो शांत होण्यास मदत होईल
त्यांची चिडचिड कमी होईल त्यांचा त्रास देणे सुद्धा नक्कीच कमी होईल असं सांगितलं जातं तर हा उपाय पिठोरी अमावस्येच्या दिवशीच करावा त्या दिवशी काही तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करून घ्यावा ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी हा भात तयार करावा दुपारी १२ वाजायच्या आत हा भात तयार करून झाला की हा तयार झालेला भात मुलांवरून एका प्लेटमध्ये घेऊन ओवाळावा अगदी आरतीचं ताट ओवाळतो तसा हा भात एका प्लेटमध्ये काढून ओवाळला जाऊ शकतो
त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा बालकणीमध्ये किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये सुद्धा ठेवू शकता तो एका पानावर किंवा एका कागदावर ठेवला तरी चालतो आणि हा भात पक्षांना खायला द्यावा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे या उपायाने आपल्या मुलाचा चिडचिडा स्वभाव अगदी शांत होण्यास मदत होते असं सांगितले जातात शिवाय तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारचा संकट येत नाही आणि म्हणून अगदी न विसरता आठवणीने पिठोरी अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी आईने हा एक सोपा उपाय नक्की करावा.