इच्छा पूर्ण होत नाही तर १४ सप्टेंबर गुरुवार मोठी अमावस्या इथ ठेवा मीठ इच्छा पूर्ण होईल

उपाय

नमस्कार मंडळी

मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला अनेक कष्ट घेऊन देखील यश मिळत नसतं बऱ्याचदा खूप कष्ट करून देखील बरकत मिळत नसते त्या पाठीमागचं कारण असते घरातील नकारात्मक ऊर्जा सतत समस्या सतत अडचणी जर तुम्हाला देखील सामना कराव्या लागत असतील तर निश्चित रूपाने त्या पाठीमागे असते नकारात्मक ऊर्जा बऱ्याचदा घरातील सर्वजण आजारी पडतात किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर अनेक ठिकाणी अत्यंत चांगले उपचार करून सर्व ठिकाणी उपचार करून देखील काही फायदा होत नाही

आजारपण काही घरातून बाहेर जात नाही घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नसतो किंवा मग आलेला पैसा लवकर संपून कर्जबाजारी पण अंगावरती येतं त्याचबरोबर घरात सतत वाद होतात घरातील शांतता जाऊन अशांतता येते घरात सगळ्यांचे एकमेकांशी पटत नाही मतभेद होतात त्याचबरोबर जो काही व्यवसाय आहे जो काही धंदा तुमचा आहे त्याच्यामध्ये बरकत येत नाही विविध अडचणी येतात अचानक धंदा मंदावतो नोकरीमध्ये बरकत मिळत नाही

तर या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असते ती नकारात्मक ऊर्जा तर अशा घरातील नकारात्मक ऊर्जेवरती अत्यंत साधा सोपा असा मिठाचा उपाय आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मिठाला वास्तुशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आजचा उपाय देखील वास्तुशास्त्रातच सांगितला गेलेला आहे. मित्रांनो मीठ हे अत्यंत परिणामकारक वास्तुशास्त्राने सांगितलेलं प्रभावी माध्यम मिठामध्ये इतकी ताकद असते की राहू केतूच्या वाईट प्रभावापासून हे मीठ आपल्याला दूर ठेवू शकतो

मात्र हे मीठ घरामध्ये ठेवताना काही काळजी घ्यायची ते म्हणजे हे मीठ कधीही तुम्ही तुमच्या घरामध्ये लोखंडी किंवा स्टीलच्या बरणीमध्ये ठेवू नका प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीत ठेवल्यास उत्तम जर तुम्ही असं केलं तर जो काही मिठाचा प्रभाव आहे तो वास्तुशास्त्रात दृष्ट्या प्रभावित होऊन तुम्हाला तुमच्या घराचं रक्षण करतो नकारात्मकतेला दूर ठेवतो त्यानंतर पाण्यात मूठभर मीठ टाकून जर त्या पाण्याने फरशी पुसून घेतली तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तर आज आपण बघणार आहोत

घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी वास्तुशास्त्राने सांगितलेला उपाय तर त्यासाठी आपल्याला एका काचेच्या वाटीमध्ये मीठ घ्यायचे आणि वाटी नसेल तर कोणताही काचेचं भांड तुम्ही घेऊ शकता जे उघडे तर त्या भांड्यामध्ये पण ते काचेच असलं पाहिजे तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आणि ते मीठ तुमच्या घराच्या मुख्य खोलीमध्ये म्हणजे हॉलमध्ये दक्षिण दिशेला ठेवायचे तर जर हे मिठाचं काचेचं भांड तुम्ही दक्षिण दिशेला तुमच्या हॉलमध्ये ठेवलं

तर निश्चित रूपाने त्या मिठामध्ये तुमच्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि त्यामुळे त्या मिठाचं पाणी होतं आणि जेव्हा केव्हा जेवढे दिवस ते मीठ आहे तुम्ही दररोज त्याला बघा जेव्हा त्या मिठाचे पाणी होईल तेव्हा तुमच्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा शोषली गेलेली असते आणि ते पाणी पुन्हा आजूबाजूच्या झाडांना किंवा कुठेतरी घराबाहेर टाकून द्या आणि पुन्हा त्या भांड्यामध्ये मीठ घालून ठेवा जर हा उपाय तुम्ही केला तर निश्चित रूपाने तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही