फक्त शनिवारी हे उपाय करा अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील

भक्ति

नमस्कार मंडळी

आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्या साठी जे काही करता येईल ते ते पर्यंत प्रत्येक व्यक्ती करत असतो. कष्ट करून जी इच्छा आपली पूर्ण होते त्याचा आनंद हा पहाण्यासारखा असतो. पण काही जणांची किती हि इच्छा असली तरी काम पूर्ण होत नाही. त्या लोकांसाठी एक महत्वाचा निमय आहे. जर का त्यांनी तो पूर्ण केला तर त्यांच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल किंबहुना त्या त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होईल. आपलं कोणतेही कार्य जर पूर्ण होत नसेल, एखाद्या विशिष्ट कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील. आपले काम किंवा इतर कोणतेही आपले महत्वाचे कामं पूर्ण होण्यासाठी बाधा होतं असेल आपल्याला सफलता प्राप्त होतं नसेल.

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमजोर असेल, तर व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतें. तर जेव्हा शनि बलवान असतो तेव्हा व्यक्तीचे दिवस पालटतात. शनिवारी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते, असं सांगितलं जातं. तसेच शनिवारी काही उपाय करून पाहिल्यास शनिदेवाची व्यक्तीवर प्रसन्न होतात. तसेच आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत काय आहे हे उपाय चल तर मग जाणून घेऊयात ह्याने आपले काम यशस्वी होते.अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तो म्हणजे गायत्री मंत्र त्याचा आपण जर नियमितपणे जर ११ वेळा दररोज सकाळी जर जप केला तर ह्या मंत्राच्या प्रभावाने सुद्धा सर्व बाधा सर्व कष्ट दूर होतात,

आणि त्याहीपेक्षा सरस उपाय म्हणजे आपल्याला सकाळी कोणत्या कामाला बाहेर पडायचे असेल तर गणपती बाप्पांना २१ दुर्वा अर्पण करा. त्यांची पूजा करा व मनोभावे त्यांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडा. तुमचे काम नक्की यशस्वी होणार.

गाईला तेल लावलेली पोळी भाकरी खायला द्या हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाधीशाचं स्थान आहे. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात. असं मानले जातं की ज्या व्यक्तीच्या जीवनात शनिदेव प्रतिकूल ठिकाणी असतात, त्यालाअनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र शनिदेवाच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर गायीला तेलातली पोळी खाऊ घातल्यास कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते, असं म्हटलं जातं. शनिला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास करतात. पूजेसह विविध उपायही अवलंबतात, जेणेकरून शनीचा कोप टाळता येईल.

यामुळे शनिची कृपा होते. तसेच शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर स्नानानंतर शनिची पूजा करावी. यामुळे व्यक्तीपासून दु:ख, कलह आणि अपयश दूर जातं. तसंच नशीब फळफळतं. ज्योतिष शास्त्रानुसार मोहरीच्या तेलात लोखंडाचा खिळा टाकून ते दान करा.सोबतच पिंपळाच्या मुळात अर्पण करा, असं केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात या दिवशी छाया दानाचेही विशेष महत्त्व आहे. पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात चेहरा पहा आणि नंतर ते शनि मंदिरात ठेवा. उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापना करुन श्रीमहालक्ष्मीची प्रतिमा लावावी.

आपल्या घरात केरसुणी अथवा झाडू आणि आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टिक्षेपात येईल अशी ठेऊ नका. आपल्या वास्तुमध्ये कधीही भांडणतंटे, मोठ्या आवाजात बोलण टाळा. कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकण टाळा. आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बीजागर किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करा.घरात जाळ्याजळमट नसावी आणि घरातील गळते नळ बंद करा.जुनी बंद पडलेली घड्याळ, टाइप राइटर, बिघडलेल इलेक्ट्रॉनिक सामान, जुने न वापरत असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा.

आपण घरातून बाहेर पडताना एक नाणे घेऊन पडावे आणि तुम्हाला रस्त्यात एखादा गरजू भिकारी दिसला तर अश्या व्यक्तीस आपण हे नाणे अगदी निस्वार्थ भावनेने आपल्या उजव्या हाताने द्यावे. हा छोटासा उपाय आपल्या कार्यात येणाऱ्या बाधा नक्की दूर करतो. अनेकजणांना वाटेल कि हा छोटासा उपाय करून कश्या बरे बाधा दूर होतील तर मित्रांनो कोणत्याही गोरगरिबास आपण जे नाणे दान म्हणून देत असतो त्याच्या बदलता जे आशीर्वाद प्राप्त होतात त्याची ताकद खूप मोठी असते. गर्भश्रीमंतांना ह्या आशीर्वादाची ताकद कदाचित समजणार नाही.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.