केस आणि नखे यादिवशी कापल्याने कर्त्या माणसाला विशेष धनलाभ होतो

वास्तु

नमस्कार मंडळी

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपले वार्षिक सणवार, काही महत्वाचे दिवस असतात. ज्योतिष्यानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाला एक शासक देवता आणि एक शासक ग्रह असतो. म्हणून, प्रत्येक दिवशी केले जाणारे कार्य अशा प्रकारे केले पाहिजे की ते देवतांना संतुष्ट करतात आणि ग्रहांना शांत करतात. यामध्ये आपल्या रोजच्या दिनक्रमातील बर्‍याच गोष्टींचा समावेश होतो. जसे की नवीन खरेदी, प्रवास, महत्वाच्या कामाची सुरवात इ. पण इतकेच नाही तर अगदी नवीन कपडे घेणे, केस कापणे अशा गोष्टीसाठीही वेळ सांगितलेली आहे.

यात अजून एक गोष्ट आहे, तसे पहायला गेले तर ती गोष्ट किरकोळ आहे, पण त्यासाठी देखील आपल्या फल ज्योतिष्याने वेळ, वार संगितले आहेत. ती गोष्ट म्हणजे नखे व केस कापणे. आयुर्वेदानुसार हाता-पायांची नखे नियमित कापल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. नखांच्या रंगानुसार विविध आजार ओळखता येतात. सध्याच्या धावपळीच्या काळात नखे कापायला एखाद्या ठराविक दिवशी वेळ मिळतोच, असे नाही. सहसा केस व नखे वाढल्यावर कापली जातात, पण भारतीय तत्वज्ञानानुसार नखे ही अहंकाराचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे ती लगेचच कापली जावीत. आठवड्यातील याच दिवशी आपण केस व नखे कापली पाहिजेत.

हा साधा आणि सोपा असा उपाय असला तरी आपण खूपसे त्याच्याकडे विशेष पाहत नाही.महिन्याच्या आठवड्यातील या दोन दिवशी केस आणि नखे कापा आपले कर्ज लवकर फिटेल, पैसेही येतील. असे केल्याने आपण करत असलेल्या कामाला यशही प्राप्त होईल. ज्या घरात कर्ज असते त्या घरच्या कर्त्या माणसाला मोठे तणाव असतात. आणि अशा घरातील लोक कर्जाने खूप थकलेले असतात. कंटाळलेले असतात. काही केल्या कर्ज फिटत नसते.घरात कुठल्याही प्रकारे नव्याने पैसा येत नसतो. आणि असे का होते हे पाहण्यासाठी आपण मग विविध उपाय तोटके करू लागतो. घरातील नकारात्मक ऊर्जा अशाच प्रकारचा एक उपाय आज आपण आज आपण जाणून घेणार आहोत.

हा उपाय केल्याने आपले कर्ज तात्काळ फिटते.घरात येणारी थांबलेली माता लक्ष्मी लवकर घरात येते. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. घरातील आजारपण दूर होते. घरात ऐश्वर्य प्राप्त होते. आपल्या हिंदु धर्म शास्त्रानुसार आपली केस व नखे या दिवशी कापल्यास आपल्याला विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आपल्या बाबतीत सर्व काही सकारात्मक घडत जाते असे अनेक ठिकाणी सांगण्यात आले आहे.कोणते आहेत हे वार कोणते ? महिन्याच्या आठवड्यातील हे दोन दिवस म्हणजे बुधवार आणि शुक्रवार हे वार आहेत. या दोन दिवशी आपण जर आपली नखे कापली किंवा केस कापले की आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकर निघून जाते.

सकारात्मक ऊर्जा लवकर प्राप्त होते.आणि आपली कर्जमुक्त होण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. बघता बघता दिवसागणिक आपले कर्ज फिटून जाते. पैसे येतात. या दिवशी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते. या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये आशीर्वाद राहतो आणि धन मिळण्याचीही शक्यता असते. म्हणजेच केस आणि नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. शुक्रवार हा दिवस सौंदर्याचा दिवस मानला जातो. आठवड्यातील या दोनच दिवशी आपली केस व नखे कापली पाहिजेत यामुळे आपले सर्व कार्य मार्गी लागतात. वेगवेगळ्या प्रकार वर सांगितलेल्या दोन वार दिवशी म्हणजेच बुधवारी व शुक्रवारी केस व नखे कापल्यास आपल्या घरावरील वाईट दृष्टी, कुठल्याही प्रकारची बाधा, वाईट नजर अशा काही गोष्टी असतील त्या निघून जातील.

यामुळे साहजिकच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. असे जरी असले तरी आपल्या घरातील वातावरण आणखी आनंदमय होण्यासाठी तसेच आपले घर सुख समृद्धीने व भरभराटीने भरून जाण्यासाठी आपल्या घरात शक्य तितका वेळ कुठल्याही देवाचे नामस्मरण, स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. या नामस्मरणाने देखील घरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा वाढत असते. तर आपण बुधवारी व शुक्रवारी केस व नखे कापा याचा फरक आपणाला दहा ते पंधरा दिवसात दिसून येईल. आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य वाढीस लागेल. आणि या काळात आपण शक्य तितके दान करण्याचा प्रयत्न करावा, स्वामींचे नामस्मरण करावे.

त्यामुळे आपले आयुष्य हळूहळू सुखकर बनत जाईल. याउलट आपण शनिवारी किंवा सोमवारी केस कापल्यास आपल्याला अधोगती प्राप्त होते असे जुने लोक सांगतात हे तुम्ही देखील ऐकून असाल. आणि ते खरे व बरोबर आहे. सोमवारी व शनिवारी या दोन दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत. शनिवार ‘न करत्याचा वार शनिवार’ असे म्हंटले जाते. त्यामुळे शनिवारी अजिबात नखे कापू नयेत असे आवर्जून सांगण्यात येते. शनिवार नखे कापण्यासाठी अजिबात चांगला दिवस नाही. शनिवारी नखे कापल्यामुळे वाईट गोष्टींमध्ये मन गुंतले जाते अशी मान्यता आहे म्हणून शनिवारी नखे कापू नयेत.

तसेच आपल्या घरातील मंडळीनाही या दिवशी केस कापण्यास किंवा नखे कापण्यास सांगू नये. त्यांनीही या दिवशी केस नखे कापू नये.या दिवशी केस अन् नखे कापणे आहे अशुभ सोमवारी हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. यासह हा चंद्राचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी केस आणि नख कापणे अशुभ मानल्या जाते. या दिवशी केस कापल्याने केस कापल्याने आपल्या आरोग्यवर परिणाम होतो असे मानले जाते.मंगळवारी केस किंवा दाढी कापू नये असे सांगितले जाते. याचा थेट परिणाम व्यक्तीच्या वयावर होतो असे मानले जाते. या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे वय कमी होते याशिवाय या दिवशी नखे कापल्याने शरीरात रक्ताशी संबंधित आजार होतात.

त्यामुळे या दिवशी केस, नखे आणि दाढी कापू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.गुरुवारी नखे आणि केस कापू नये. श्री विष्णू आणि लक्ष्मीचा हा दिवस गुरुंना समर्पित असून या दिवशी केवळ उपासना करावी असे सांगितले जाते. या दिवशी ही कामे केल्याने प्रतिष्ठेला हानी पोहचू शकते.नखे आणि केस अजिबात कापू नये. या दिवशी कामे केल्याने शारीरिक व्याधी जडतात असे सांगितले जाते

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.