२०२३ मध्ये कोणत्या ५ राशीन आहेत लग्नाचे योग नक्की जाणून घ्या

Rashifal

नमस्कार मंडळी

तुम्ही अविवाहित आहात का अर्थात लग्नासाठी स्थळ बघताय का किंवा तुमच्या घरात असं कुणी आहे का ज्यांच्या लग्नासाठी स्थळ बघितले जातात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की २०२३ या वर्षामध्ये कोण कोणत्या राशीचे विवाह योग आहेत अर्थात कोण कोणत्या राशीचे लग्न होऊ शकत चला तर मग सुरवात करूया २०२३ मध्ये ज्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास २०२३ या वर्षामध्ये मेष राशीसाठी लग्नाचे योग आहेत अर्थात कोणी मेष राशीचे अविवाहित तरुण तरुणी लग्नासाठी स्थळ बघत असतील तर त्यांचं लग्न जमण्याची शक्यता या नवीन वर्षामध्ये आहे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येईल

त्यामुळे मेष राशीचे जे तरुण-तरुणी अविवाहित आहेत त्यांनी नवीन जोमाने उत्तम जोडीदाराचा शोध घ्यायला काहीच हरकत नाही त्यांच्या प्रयत्नांना २०२३ या नवीन वर्षामध्ये नक्कीच यश मिळेल २०२३ वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणारे या काळात तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चे नाते खूप मजबूत होईल जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल तर तुम्ही त्या व्यक्तीला तुमचं प्रेम सांगू शकता यावर्षी तुमचे विवाह जमण्याचे योग आहेत आणि काय सांगावं समोरून सुद्धा होकार येईल आणि २०२३ च्या अखेरीस लग्न सुद्धा होऊ शकतात आणि जरी तुम्ही ठरवून लग्न करणार असाल अर्थात अरेंज मॅरेज करणार असाल तरी सुद्धा स्थळांचा शोध नवीन जोमाने घ्या नक्कीच या वर्षी तुमचं लग्न जमण्यात योग आहेत आता वळू या पुढच्या राशीकडे आणि ती आहे

वृषभ रास वृषभ राशीचे लोक असे अविवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून स्थळ शोधत आहेत त्यांचा शोध यावर्षी संपू शकतो तुम्हाला एक योग्य जीवनसाथी या वर्षी मिळू शकतो या वर्षी अर्थात येणार नवीन वर्षामध्ये २०२३ मध्ये आणि विशेषतः जानेवारी ते एप्रिल या महिन्यात तुम्ही लग्नगाठ बांधू शकता या कालावधीत अविवाहित लोकांचे विवाह ठरतील याशिवाय २०२३ ची भविष्यवाणी सांगते की वृषभ राशीचे लोक जे प्रेमात आहेत किंवा कोणाशी तरी नात्यांमध्ये आहेत रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचे सुद्धा हे वर्ष खूप चांगले जाईल तुमच्या दोघांचा एकमेकांवरचा विश्‍वास वाढेल आणि अशा परिस्थितीत २०२३ मध्ये तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही सप्तपदी सुद्धा चालू शकता आणि सात जन्मांच्या या पवित्र बंधनात अडकले जाऊ शकता

मिथुन रास -मिथुन राशि साठी लग्नाच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष फलदायी असणार आहे विशेषत २०२३ चौथ्या महिन्यानंतर म्हणजेच २२ एप्रिल २०२३ नंतर जेव्हा गुरू तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करेल आणि तुमच्या स्थापना आणि पाचव्या भावात पूर्ण स्थान असेल अशावेळी मिथुन राशीच्या लोकांच्या नात्यात गोड वाढेल आणि विश्वास वाढेल अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकता आणि ग्रहांची ही स्थिती असं दर्शवते की जोडीदार तुमच्या प्रस्तावाला होकार ही देऊ शकतो आणि तुम्ही लग्न सुद्धा करू शकता त्यामुळे मोकळ्या मनानी एखाद्याला प्रपोज करायचा असेल तर हे वर्ष उत्तम आहे

तूळ रास विवाह योग २०२३ नुसार नवीन वर्षात म्हणजे २०२३ मध्ये विविध ग्रहांचे संक्रमण तुला राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देऊ शकते या वर्षीचा चौथा महिना म्हणजे एप्रिल महिना या राशीच्या लोकांसाठी आयुष्यात अनेक बदल घडवून आणणारे ठरले २२ एप्रिल २०२३ रोजी देवगुरु तुमच्या सातव्या भावात प्रवेश करेल लग्नघर आहे आणि तेव्हा तुमचा प्रेम विवाह होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी किंवा अडथळे असतील तर तेही या काळात दूर होतील म्हणजेच विवाहित आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे असतील तर तेसुद्धा या काळात दुसरीकडे सप्तम भावात गुरू संक्रमण देखील पदवीधरांसाठी खूप खास असेल

शेवटची रास म्हणजे मीन रास २०२३ हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारे ठरेल अविवाहित आहेत किंवा नुसतेच रिलेशनशिप मध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीदाराशी लग्न करू इच्छितात तर हा कालावधी तुम्हाला तुमच्या नात्याला पुढे नेण्याची संधी तुम्हाला देईल ज्यामध्ये तुम्हाला सुद्धा मिळू शकत त्यामुळे मीन राशीचा तरुण-तरुणींना सुद्धा अर्थात अविवाहितांना सल्ला देण्यात येतोय की तुम्हीसुद्धा नव्या उत्साहाने आणि नव्या जोमाने स्थळ शोधा या वर्षी तुमचं लग्न होऊ शकत तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांच्या लग्नाचे योग २०२३ मध्ये आहेत

आता अर्थात बाकीच्या राशींची लग्न होणारच नाहीत का तर असं नाही प्रत्येकाची वैयक्तिक कुंडली सुद्धा एक मोठी भूमिका आपल्या आयुष्यात पार पाडत असते वयक्तिक ग्रहमान सुद्धा असू शकतो असू शकतात की ज्यामुळे तुमच्या लग्नाचे योग जुळून येतील बाकीच्या राशी निराश होण्याचं कारण नाही पण या पाच राशी अशा आहेत की ज्यांच्या लग्नाचे योग ज्योतिष शास्त्रानुसार आहेत आणि त्यामुळे त्यांनी प्रयत्न मात्र करायला हवेत तुम्ही जर स्थळ शोधलीच नाही तर लग्न कसं जमेल म्हणून प्रयत्न करा योग आहेत नक्कीच तुमचं लग्न होईल