अधिक महिन्याची कहाणी एकदा तरी नक्की वाचा पुण्य मिळेल

भक्ति

नमस्कार मंडळी

एक दिवशी तपो मनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते त्या ठिकाणी महर्षी व्यास आले ते म्हणाले आता पुरुषोत्तम मास येणार आहे या महिन्यात स्नान दान व्रत नियम अशी खूप कर्म करावयाचे आहेत ऋषीमुनींना आश्चर्य वाटले ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली महर्ष व्यास म्हणाले चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी दहा दिवसांचा फरक पडत असतो म्हणून दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरून कालमेळ बसवलेला आहे

तो अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास होय महर्षी व्यास म्हणाले की तेराव्या महिन्याची कथा मला नारदाने सांगितली. नारद पृथ्वीवर फिरत होते त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसं दिसली पृथ्वीवरील माणसांचे दुःख कसं दूर करावं याचा विचार करत नारद वैकुंठाला आले भगवान विष्णू ध्यान करत होते नारदांनी विष्णूंना विचारलं आपण कशाचा ध्यान करतात विष्णू म्हणाले नारदा अधिक मास येणार आहे त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे

त्याचा मी ध्यान चिंतन करत आहे त्याच्या कृपाप्रसादाने अनेकांची दुःख कमी होतील त्या अधिक मासाचं अतिशय महत्त्व आहे नाराज म्हणाले देवा मृत्यू लोकातील माणसंही दुःखी आहेत त्यांचा दुःख नाहीसा करणाऱ्या अधिकमासाची कहाणी आपण मला सांगावी आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकावींन आणि त्यांचं दुःख कमी होऊ शकेल भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले चंद्र सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरावा लागतो

या महिन्यात सूर्य संक्रांत नसते आणि म्हणून त्याला मलीन महिना किंवा मलमास म्हणतात या महिन्यात लग्न कार्याधी मंगल कार्य करत नाहीत मी त्या मलीन अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचे दिव्य रूप प्राप्त करून दिले गोपाळ कृष्णाने वर दिला या महिन्यात तीर्थस्थान व्रत नियम वगैरे धर्मा चरणाचे पुण्य कर्म करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल त्यांचे जीवन सार्थक होईल त्यांचे मनोरा पूर्ण होतील एक दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे

म्हणून श्रीकृष्ण विचारले त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले अधिकमासातील व्रत करावे नियम पाळावेत पुरुषोत्तमाची सेवा करावी श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्य कर्म केली. त्यांना राज्य मिळाले आणि ते सुखी झाले अधिकमासामध्ये अनेकांनी पुण्य कर्म करून जीवन सुखदायी बनवले अधिक मासा कळत नकळत जरी पुण्य घडलं तरी भगवान श्रीकृष्ण त्या भाविकांचे कल्याण करतात त्यासाठी अधिक मासांमध्ये पुण्य कर्म करावं