तुमच्या घरामध्ये कोरफड आहे मग नक्की जाणून घ्या शुभ आहे कि अशुभ आहे

वास्तु

नमस्कार मंडळी

सौंदर्या साठी वरदान मानलेली कोरफड जी केसांसाठी तर उत्तम असतेच पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते अनेकही इतर औषधी उपयोग या कोरफडीचे असतात आणि म्हणूनच हाली सगळ्या घरांमध्ये ही कोरफड घरात लावली जाते. गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफड लावण्याची पद्धत आता सगळीकडेच रुळीये पण ही कोरफड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग कोणते फायदे असतात चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊ
वास्तुशास्त्र कोरफडी बद्दल काय म्हणतायेत ते जाणून घ्यायला

वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असे सांगितले जातात वास्तू नुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाड वनस्पतींमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत कोरफड ही एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतो त्याला अपवाद मात्र कोरफड आहे कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळे सुद्धा दूर करते कशी सांगते ऐका कोरफडशी संबंधित काही वास्तु टिप्स आहेत

त्या तुम्ही केल्यात तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतात तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतात घरामध्ये कोरफड लावणं वास्तू नुसार खूपच शुभ मानला जातो हे रोप घरामध्ये लावल्याने सौभाग्य वाढतं. घरामध्ये यश प्राप्ती हवी असेल तर कोरफड अवश्य लावावी कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून तर जर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरफड फिरवून ती कचरा टाकली जाते आणि याने नजर दोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते त्यामुळे तर हा उपाय अगदी कुणीही करू शकतात

बरं या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याची ही गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतात म्हणूनच कोरफडीचे लहान स्वरूप सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधल तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठली नकारात्मकता धरत येत नाही त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो फक्त इतकाच नाही बर का पण कोरफड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी कशी घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते. पण हे सगळं कधी मिळतं तर हे रोप कोणत्या दिशेला लावले ते जाणून घ्या

आधी वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड लावणं उत्तम मानले जातात याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरफड तुम्ही लावू शकतात त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मनप्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर घरातलं वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनलं तर आपला आयुष्य ही सुंदर बनत कोरवड घरामध्ये लावल्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते प्रेम राहतात कोरफड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते कोरफडीच्या वापराने आरोग्य ही चांगला राहत

ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरफड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा बर का म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा गर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलाच त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरफड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्यत कोरफड वनस्पतीच्या काळजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका या झाडांना फारच कमी पाणी लागतात जास्त पाणी दिल्याने याची पानं पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही