कर्ज मुक्त व्हायचं तर करा हा उपाय

भक्ति

नमस्कार मंडळी

कर्ज हे एक असे दलदल आहे, ज्यात एकदा तुम्ही अडकला तर त्यात अडकतच जातात. ज्योतिष शास्त्रात षष्ठम, अष्टम, द्वादश भाव आणि मंगळाला कर्जाचे कारक ग्रह मानले जातात. मंगळ जर निर्बळ असेल किंवा पाप ग्रहाशी संबंधित असेल किंवा अष्टम, द्वादश, षष्ठम भावात नीच स्थितीत असल्यास व्यक्ती सदैव ऋणी बनून राहतो.

अशात जर मंगळावर शुभ ग्रहांची दृष्टी पडली तर कर्ज तर असतो, पण ते फेडण्यात फार अडचणींना तोंड द्यावे लागते. शास्त्रानुसार मंगळवार आणि बुधवारी कर्जाचे घेवाण देवाण टाळले पाहिजे. मंगळवारी कर्ज घेणारा व्यक्ती सोप्यारीत्याने कर्ज फेडू शकत नाही आणि त्याच्या संतानाला या कारणांमुळे त्रास भोगावा लागतो.

जर तुमच्या डोक्यावरती प्रचंड कर्ज झालेला असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्ज चुकवता येत नाही तर अशावेळी सर्व वृक्षांमध्ये झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे वडाचे झाड स्कंद पुराण असे सांगते की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर यांची पूजा आपल्याला कर्जमुक्ती प्रदान करते.

शनिवारी ऋणमुक्तेश्वर महादेवाचा पूजा करायला पाहिजे. नारळ आणि चमेलीच तेल आपण चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि नंतर त्या टिळ्याने एका नारळावरती स्वस्तिक काढावे. नंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा या नारळाबरोबर मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋणमोचक मंगल स्त्रोत वाचावे हा उपाय केल्याने आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल. ज्यामुळे आपण कर्ज परत करण्यास सक्षम बनवू व काळजा परत करू शकतो.

शनिवारच्या दिवशी आपण एका मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे आणि नंतर हा दिवा व्यवस्थित झाकावा या दिव्याला झाकल्यानंतर नदी किनारी जाऊन एक खड्डा बनवून या दिव्यास त्या खड्ड्यात पुरावे.हे सगळे केल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपल्या घरी यावे.

कर्जमुक्ती मिळण्यासाठी दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळ यांची गरज लागेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल. या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळाला गुंडाळावा त्यानंतर नारळाची पूजा करावी पूजा करून झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करावा. लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारीच करावा.

जर तुम्हाला सातत्यानं कर्जाची समस्या उद्भवत असेल तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, तसंच देवाकडे कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. शनिवारी पिंपळाच्या झाडावर सर्व देवांचा वास असतो असं मानसं जातं. त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं.कर्जमुक्तीसाठी २१ शनिवार हनुमान मंदिरात जाऊन श्रद्धेने ११ वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे कर्जमुक्ती तर होईलच, पण तुमचा व्यवसायही वाढतो असं म्हटलं जातं.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.