पैशांच्या जास्तीत जास्त बचतीसाठी वास्तुशास्त्राचे उपाय

वास्तु

नमस्कार मंडळी

तुमचं जे काही उत्पन्न आहे पण त्यात तुम्हाला जास्तीत जास्त बचत करायचे का आणि काही केलं तरी ती बचत काही होत नाहीये पगार कमी पडतोय असं वाटतंय का? मग तुम्ही काही गोष्टींचा अवलंब आजच केला पाहिजे कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया
मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत ज्या नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते तसंच जे काही आपण कमावलं आहे

त्यात आपल्याला समाधानी मिळतं आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक कष्ट करून पैसे कमवतात पण बचत मात्र होत नाही आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो असं होऊ नये म्हणून वास्तुशास्त्राने काही उपाय सांगितले आहेत जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर हे पाच उपाय करून बघा या उपायांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही त्यामुळे निश्चितच तुमची बचत होईल चला बघूया

पहिला उपाय काय आहे फरशी पोहोचताना मिठाचा वापर करा वास्तुशास्त्रानुसार रोज घराची साफसफाई करताना मीठ पाण्यात मिसळून घर पुसलं तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो त्याचबरोबर कुटुंबातील समस्या ही दूर होतात तुम्हाला होणारे सततचे त्रास अनावश्यक खर्च मानसिक तणाव या सगळ्याच गोष्टी त्यामुळे दूर होतात पण लक्षात ठेवा की रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी मात्र घर पुसताना मिठाच्या पाण्याचा वापर करू नका. इतर दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसू शकता.

दुसरा उपाय झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोटसं काम करायचं नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवा ते स्वच्छ कोरडे करा आणि मगच झोपायला जा ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल रोज असं केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता तर दूर होतील पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या भोवती जाणवेल ज्यामुळे तुम्हाला तुमचा ध्येय साध्य करण्यात मदत होईल हे तुमच्या झोपेसाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि ही सवय तुमच्या नकारात्मक वेळेला सकारात्मकतेत बदलेल

तिसरा उपाय म्हणजे घराबाहेर कचरा साठू देऊ नका आर्थिक प्रगती आणि भाग्याची साथ लाभावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरासमोर कधीही कचरा साठू देऊ नका त्याचबरोबर घरात रोज पूजा करण्याआधी दारासमोर गंगाजल नक्कीच शिंपडा त्यामुळे माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो घरातील सदस्यांमधील समस्या दूर होतात प्रेम वाढते आणि घरात सुख-समृद्धी वाढते. पुढच्या उपायाकडे वळूया. पुढचा उपाय असा आहे

की सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना तुम्हाला आरतीमध्ये कापूर जाळतात असं म्हटलं जातं की कापुराचा वास वातावरणात पसरल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर कापुराचा धूर वैश्विक ऊर्जेची जोडला जातो ज्यामुळे घरातील पूजा स्थानाचा मार्ग मोकळा होतो असं केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर काही स्तोत्र आहे जी तुम्ही रोज पठण करायला हवी त्यामध्ये एक स्तोत्र म्हणजे लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्र ही स्तोत्र रोज पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते पैसा मिळवण्यासाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं. ही स्तोत्र चमत्कारिक आहे ज्याच्या पठणाने माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही

मित्रांनो या गोष्टी करत असताना आपण वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात जसे की अनेकांना जेवण करताना अभ्यास करायची किंवा काम करायची किंवा काहीतरी खात खात काम करण्याची सवय असते ही सवय अशुभ मानली जाते ही सवय तुम्ही टाळायला हवी आर्थिक गोष्टींसाठी ही सवय हानिकारक ठरू शकते. जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते जर तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केलं तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे आरोग्याची संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे ही सवय तुम्ही टाळायला हवी. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण काही उपाय ते पाहिले जे तुम्ही केले तर तुमच्या घरात पैसा टिकेल आणि वाढेल