शनिवारी या ३ वस्तू दिसल्या तर समजा शनी देव तुमच्यावर प्रसन्न आहे तुमची सर्व कामे पूर्ण होणार

भक्ति

नमस्कार मंडळी

शनिवार चा दिवस हा अशुभ मानला जातो, कोणत्याही कामाची सुरुवात किंवा कोणतेही काम तुम्ही जर शनिवारच्या दिवशी केले त्यामध्ये अनेक अडथळे येतात , ते काम पूर्ण होत नाही, त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. शनिवार चा दिवस हा शनिदेवांचा दिवस असतो. शनिदेवांना सगळेच घाबरतात.जर तुम्ही शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या या काही गोष्टी पहिल्या तर समझून जा कि शनिदेवाची कृपा तुमच्यावर आहे.

शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि जर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असतील , त्यांची कृपा तुमच्यावर झाली तर कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला अडथळे येत नाही. कोणतेही काम जर तुम्ही हाती घेतले असेल त्यात यश सफलता हे नक्कीच मिळते.जर तुम्ही हे काम शनिवार च्या दिवशी केले तरी सुद्धा तुम्हाला यश नक्कीच मिळते. चला जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत कि ज्या पाहिल्याने शनिवार चा दिवस हा अत्यंत शुभ जाईल आणि त्याने तुम्हाला काय लाभ होणार आहे .

शनिवारी उठल्या उठल्या जर तुम्हाला सफाई कर्मचारी दिसला , हा कर्मचारी साफ सफाई करत असेल अशा वेळी तुम्ही जर त्याला पहिले तर हे अत्यंत शुभ मानले जाते. त्या वेळेस त्या कामगाराला यथाशक्ती थोडेसे पैसे किंवा अन्न नक्की द्या, शास्त्रामध्ये असे सांगितले आहे कि असे केल्याने तुमचे कोणतेही कार्य असो ते निर्विघ्नपणे पार पडते ,म्हणजेच कोणतेही कार्य तुम्ही करायला गेलात तर त्यामध्ये अडथळे येत नाही.

शनिवार उठल्या उठल्या जर तुम्हाला एखादा भिकारी भिख मागताना दिसला तर त्या गरजू व्यक्तीला यथाशक्ती दान नक्की करा. हा अत्यंत शुभ संकेत आहे. फक्त भिकारीच नाही तर इतर कोणतेही गरजू व्यक्ती तुमच्या जवळ आली तर तिला मदत नक्की करा. यामुळे शनी देव नक्की प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा प्राप्त होते.

तिसरी गोष्ट म्हणजे काळा कुत्रा , काळ्या कुत्र्याचे शनिवारच्या दिवशी खूप महत्व आहे. जर असा काळ्या रंगाचा कुत्रा शनिवार सकाळी सकाळी तुम्हाला दिसला तर या कुत्र्यास एखादी चपाती किंवा भाकरी नक्की खाऊ घाला. या चपातीला किंवा भाकरीला तुम्ही थोडेसे मोहरीचे तेल लावायचे आहे , अशी हि चपाती तुम्हाला काळ्या कुत्र्यास खाऊ घालायची आहे. शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या काळा कुत्रा दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते.तुम्हाला या गोष्टी जरी सध्या सोप्या वाटत असल्या तरी सुद्धा तुम्ही जेव्हा कृती करावयास जाता

तुम्हाला काळा कुत्रा दिसेल तो हि शनिवार च्या दिवशी आणि त्यावेळी त्याला हि तेल लावलेली चपाती खाऊ घालणे आणि त्याने ते खाणे हि अत्यंत दुर्लभ गोष्ठ आहे. जेव्हा तुम्ही हि कृती तुम्ही कराल तेव्हा ती सफल होईलच असे नाही. या पैकी कोणतीही घटना जर तुमच्या सोबत घडली तर नक्की हे उपाय करून पहा

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.