घरात हनुमानाचा कसा फोटो लावावा नक्की जाणून घ्या नाहीतर

भक्ति

नमस्कार मंडळी

ज्या घरामध्ये बजरंग बली च चित्र असतं त्या घरामध्ये मंगळ शनी पितृदोष यांचा प्रभाव कमी असतो आणि प्रत्येक प्रकारचा संकट टाळत हनुमानजींचे चित्र घरात लावण्यासाठी काही खास नियम आहेत तसेच हनुमानजींचे चित्र घरात लावणं चांगलंही मानलं जातं पण ते कसं लावावं कोणत्या दिशेला लावावं त्याचबरोबर बजरंगबलीचा कोणत्या प्रकारचे चित्र लावल्याने आपल्याला कोणत्या प्रकारचा लाभ होतो चला जाणून घेऊया

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हनुमान जींचे चित्र घरात ठेवल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे संकट आणि अडथळे दूर होतात बजरंगबलीचे चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती घरापासून दूर राहते अशी श्रद्धा आहे म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये हनुमानाचे चित्र लावण्यासाठी काही नियम सांगितलेत वास्तुशास्त्रानुसार बजरंग बली चे चित्र नेहमी दक्षिणेकडे तोंड करून लावावं बसलेल्या स्थितीतील हे चित्र लाल रंगाचे असावे. हनुमानजींचे दक्षिणाभिमुख चित्र अधिक शुभ मानले जाते कारण हनुमानजींनी आपला प्रभाव याच दिशेला सर्वाधिक दाखवला आहे हनुमानजींचे चित्र किंवा फोटो लावल्यावर दक्षिणेकडून येणारी प्रत्येक वाईट शक्ती या चित्राकडे पाहून थांबते

अशी श्रद्धा आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी येते अचानक येणारी संकट ही टाळतात त्याचबरोबर मंगळ हा ग्रह तुमच्यासाठी अशुभ असेल तर त्याचेही शुभ परिणाम मिळू लागतात तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद मिळू लागेल त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य ही चांगले राहते सगळ्यात महत्त्वाचं मंगळ दोष दूर होतो आताच जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो अशा पद्धतीने लावला असेल की त्यांचं मुख उत्तरेकडे झालेला असेल तर या फोटोचा काय परिणाम होतो किंवा या चित्राचा काय परिणाम होतो याला उत्तरामुखी हनुमानजींचे रूप मानला जातो आणि या रूपाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात

माता लक्ष्मीचा आशीर्वाद ही आपल्याला मिळेल पंचमुखी हनुमानाचे चित्र घरात लावण्याचा फायदा काय वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती असते त्या घरातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि धनात वृद्धी होते इमारतीमध्ये पाण्याचा स्त्रोत चुकीच्या दिशेला असेल तर या वास्तुदोषामुळे कुटुंबात शत्रू अडथळे रोग निर्माण होते हा दोस्त दूर करण्यासाठी त्या वास्तूत असे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावायला सांगितले जाते पण हनुमानाचं मुख मात्र त्यात जलस्रोताकडे आहे अशा पद्धतीने ते लावावं पंचमुखी हनुमानाचे चित्र तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरही लावू शकतात अशा ठिकाणी लावू शकता

जिथे ते सर्वांना दिसेल असं केल्याने घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आता बघूया राम दरबार असलेले चित्र घरात लावण्याचा फायदा तुमच्या घरी पाहुणे येऊन बसतील अशा दिवाणखान्यात श्रीराम दरबाराचा फोटो लावा त्यामध्ये हनुमान जी भगवान श्री रामजींच्या चरणी बसलेले आहेत याशिवाय दिवाणखान्यात अर्थात हॉलमध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्रही तुम्ही लावू शकतात तुम्ही हनुमानजींचा पर्वत उचलतानाच चित्र किंवा श्रीरामाच्या भजनामध्ये मग नाचलेले चित्रही घरात लावू शकतात राम दरबाराचे चित्र घरात लावल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात

जर तुम्ही घरामध्ये हनुमानाचं पर्वत घेऊन जातानाच किंवा पर्वत उचलताना चित्र लावलं तर तुमच्या धैर्य शक्ती आणि विश्वास यामध्ये वाढ होईल जबाबदारीची भावना विकसित होईल कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घाबरणार नाही प्रत्येक परिस्थितीला तुम्ही धैर्याने सामोरे जाल वीर हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांनाही धैर्य मिळते आता जर तुम्ही घरामध्ये उडणारे हनुमंताचे चित्र लावलं तर तुमची प्रगती होते तुमच्या प्रगतीमध्ये येणारे सगळेच अडथळे दूर होतात तुम्हाला उत्साह वाटू लागेल आणि यशाच्या मार्गावर तुम्ही सतत वाटचाल करत आहात आता जर तुम्ही घरामध्ये असं चित्र लावलं की श्रीरामाच्या भजनामध्ये हनुमान मग नाही

तर हे चित्र तुमच्या मध्ये भक्तीचा विकास करेल तुमची भक्ती आणि श्रद्धा हेच तुमच्या जीवनाचा आधार आहे त्यामुळेच एकाग्रता आणि शक्ती देखील वाढेल आता जर घरात आपण असा फोटो लावला की हनुमान आणि राम एकमेकांना मिठी मारत आहेत तर हे चित्र अद्भुत आहे जे कुटुंबात एकता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करतात कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची भावना विकसित होते. डोळे बंद करून ध्यानच हनुमानजींचे चित्र जर घरात लावलं तर त्यामुळे मनाला शांती मिळते ध्यानाचाही विकास होतो त्याचबरोबर असे चित्र लावल्याने मोक्षाची इच्छा आपल्या मनात निर्माण होते संकट मोचन हनुमान आहेत हे विसरू नका.

उजव्या गुडघ्यावर बसून आशीर्वाद देतानाचा हनुमानजींचे चित्र तुम्ही पाहिलाय का त्यांना संकट मोचन हनुमान असे म्हणतात घराच्या दक्षिण दिशेला ही चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारचा संकट आपल्या घरावर येत नाही