नमस्कार मंडळी
तुम्ही कुठल्या समस्या आहे आर्थिक मानसिके शारीरिके कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या अगदी कौटुंबिक किंवा ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम असू द्या पण या संकष्टी चतुर्थीला तुम्ही एक उपाय केला तर ती तुमची समस्या सुटणार म्हणजे सुटणारच पण करायचं काय आणि असं काय केलं आणि काय बदल होणारे चला जाणून घेऊया
मित्रांनो आपलं जीवन समस्यांनी घेरलेलंच असतं असं म्हणायला हरकत नाही आणि त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. आता ४ ऑगस्टला आलेली आहे संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी खास आहे विशेष आहे कारण ती अधिक मासामध्ये आलेली आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झालं असेल की अधिकमासामध्ये जी उपासना करतो जी साधना करतो त्याचं पुण्यफळ दस पटीने अधिक मिळत म्हणूनच या अधिक मासा मध्ये जी संकष्टी चतुर्थी आली आहे त्या संकष्टी चतुर्थी पासून तुम्हाला एक उपाय करायचा आहे
फक्त पाच दिवस हा उपाय करून बघा तुमची जी काही समस्या असेल त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसेल मग ती समस्या कोणत्याही प्रकारची असू द्या म्हणजे आर्थिक समस्या असू द्या पैसे कुठेतरी अडकलेत आणि ते लवकर मिळत नाहीयेत किंवा तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळत नाहीये तुम्ही खूप झटताय किंवा नोकरीच मिळत नाहीये खूप प्रयत्न करून झालेले आहेत किंवा त्या व्यतिरिक्त कौटुंबिक समस्या सुद्धा असू शकतात समस्यांचे स्वरूप खूप वेगवेगळ्या असतात पण संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या समस्येचे स्वरूप कसंही असू द्या गणपती बाप्पा तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल फक्त तुमची श्रद्धा मात्र हवी.
श्रद्धा भक्ती पूर्ण अंतःकरणाने हा उपाय करायचा आहे पण करायचं काय सांगते ऐका तुम्हाला काय करायचंय संकष्टी चतुर्थी पासून सलग पाच दिवस अथर्वशीर्ष म्हणायचे पण ते २१ वेळा म्हणायचं म्हणजे रोज संकष्टी चतुर्थीला एकवीस वेळा म्हणायचे आणि तिथून पुढे पाच दिवस २१ वेळा अथर्वशीर्ष म्हणायचे त्याआधी अथर्वशीर्ष म्हणाला सुरुवात करण्याआधी तुम्ही गणपती बाप्पा पुढे हात जोडून तुमची समस्या सांगा आणि गणपती बाप्पाला त्या समस्येतून बाहेर काढण्याची विनंती करा त्यानंतर संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्ष म्हणा अथर्वशीर्ष हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे अथर्वशीर्ष म्हणण्यामुळे अनेक प्रकारचे बदल आपल्यामध्येही होत असतात
लहान मुलांना तर लहानपणीपासून अथर्वशीर्ष म्हणायला शिकवलं तर त्यांचे अभ्यासातही गती वाढते मित्रांनो लक्षात घ्या आपल्या स्तोत्रमंत्रांमध्ये भरपूर शक्ती आहे फक्त ती म्हणण्याची पद्धत आपल्याला माहित असायला हवी. आता हे अथर्वशीर्ष म्हणताना उपचार स्पष्ट हवेत हे लक्षात घ्या आणि २१ आवर्तन तुम्हाला सलग पाच दिवस करायचे आहेत आणि पाचव्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक बनवायचे आहेत किंवा कुठलाही गोड पदार्थ चालेल तो गणपती बाप्पा साठी बनवा आणि त्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवा या उपायाला वेळेचं बंधन नाही
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता हात पाय धुऊन स्वच्छ होऊनच हा उपाय करायचा एवढा मात्र लक्षात ठेवा सकाळी करणार असाल तर स्नान केल्यानंतर आणि संध्याकाळी करणार असाल तर हात पाय स्वच्छ धुवा देवा पुढे दिवा लावा आणि मग अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करा आता यामध्ये जर तुम्हाला काही समस्या असेल की आम्ही पाच दिवस सलग नाही म्हणू शकता आम्हाला गावाला जायचे किंवा काय तो तुम्ही तीन दिवसाचा सुद्धा हा उपाय करू शकता म्हणजे संकष्टी चतुर्थी पासून पुढे तीन दिवस या पद्धतीने सुद्धा जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा तो प्रभावी ठरतो.
गणपती बाप्पा हा भक्ताच्या हाकेला धावून येतोच येतो तुम्ही अगदी तुमच्या समस्याने त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करून बघा
४ ऑगस्ट, संकष्टी चतुर्थीला करा १ उपाय इच्छापूर्ती होणारच